Ad will apear here
Next
ईव्हीएम, व्हीहीपॅट मशिनचे ‘हुजपा’मध्ये प्रात्यक्षिक


हिमायतनगर :
शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी २०१९ रोजी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. केलेल्या मतदानाची पावती दाखविणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचेही प्रात्यक्षिक या वेळी दाखविण्यात आले.

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात हा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रात्यक्षिक पथकाचे प्रमुख म्हणून आलेले हिमायतनगरचे नायब तहसीलदार व्ही. पी. राठोड यांनी या दोन्ही यंत्रांसंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री. कंधारे, तलाठी रूपेश जाधव, मास्टर ट्रेनर व्ही. एन. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे, डॉ. डी. के. कदम, डॉ. वसंत कदम, प्रा. एम. पी. गुंडाळे, प्रा. महेश वाखरडकर, डॉ. माने, श्री. कोलेवाड, श्री. देशपांडे, श्री. नगारे, श्री. चंदापुरे यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSMBW
Similar Posts
‘हुजपा’मध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन साजरा हिमायतनगर : हिमायतनगरमधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
‘हुजपा’मध्ये हिंदी दिन साजरा हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आणि हिंदी साहित्य मंडळ व हिंदी विकास कौशल मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
‘हुजपा’मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. डॉ. डोंगरे यांना संशोधक मार्गदर्शकाची मान्यता हिमायतनगर : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थांना संशोधक मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता प्रदान करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language